विजया महिला मंडळ नंदुरबार हि संस्था गेल्या २२ वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेत ७ सभासद कार्यरत आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना वैद्यकीय मदत करण्यात येते. तसेच दारूबंदी , हुंडाबंदी यावर संस्थे तर्फे मार्गदर्शन करण्यात येते.


पावसाळ्याचे पाणी वाया जाऊ नये या करिता संस्थेने लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा इ. करिता वनराई बंधारे बांधण्यात आले. पाण्याचा निचरा होऊन नाले नदीच्या आसपासची जमिनीत पाणी झिरपण्यास मदत करीत आहे.


संस्थेमार्फत शाळा बाह्य मुलांना त्यांच्या पालकांना समक्ष भेटून शिक्षणाचे महत्व पटवून देणे व आदिवासी बोली भाषेची माहिती दिली जाते.


शेतकरी बांधवांना ठिबक चा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण देऊन कृषी तज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. नंदुरबार जिल्हात अनु जमातीचे लोक जास्त प्रमाणात असल्याने त्यांची उपजीविका वृद्धी करण्यासाठी तसेच जण जात जंगल जमीन विकासाद्वारे अल्पभूधारक , मजूर यांचे सक्षमीकरण करणे हा उद्देश आमच्या संस्थेचा आहे.


तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घरातील भटकी जमत , अनुसूचित जाती / जमातीच्या मुलं मुलींचे सामूहिक विवाह लावण्यात येतील . तसेच ग्रामीण भागात बाळ विवाह रोखण्याचे काम आमची संस्था गोपनीयरित्या करत आहे


लोक सहभागातून या श्रमदान करून वृक्ष लागवड पावसाळ्यात करण्याचे नियोजन आहे. त्यात वड, पिंपळ, लिंब, व बेल इ. वृक्ष रोपण करण्यात येतील.


वृद्ध1ांना, अपंगांना व गरजू विध्यार्थ्यांना मागणी नुसार मदत करण्याचे प्रयोजन आहे. देणगी दारांना विंनंती कि तुमचा पाठिंबा वाढावा जेणेकरून आपण एकत्र गरजूंना मदत करू. तसेच भविष्यात देशीगाय, वळू व वासरे यांचा सांभाळ, प्रजनन , संरक्षण आदी कामे करण्यावर सदर संस्था प्रयत्न्यशील आहे.

12A 80G दस्तऐवज

blog
blog
blog
blog
blog
blog
blog
blog